Abhijeet Katake Hind Kesari 2023 : पुण्याचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा हिंद केसरीच्या अंतिम सामन्यात पराभव करुन मानाची गदा पटकावली आहे. अभिजीत कटके याच्या विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष पहायला मिळत आहे. याआधी अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी होण्याचा मानही मिळवला होता.
पुणे: प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात होणार आहे. येत्या मंगळवारपासून पुण्यात कोथरुडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनाधिकृत असल्याचं पत्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने काढलय. त्यामुळे गोंधळ निर्माण झालय. या पत्रावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक मुरलीधर मोहोळ यांनी भूमिका स्पष्ट केलीय. प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अधिकृत असल्याचं त्यांनी म्हटलय.
बाळासाहेब लांडगेंनी काय म्हटलय?
कुस्तीगीर परिषदेच्या नियम व अटी मान्य न केल्याने पुण्यातील स्पर्धा अधिकृत नसल्याचं कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी पत्रक काढलं आहे.
स्पर्धेचे आयोजक मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
“महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने जनतेला एक वेगळेपण पहायला मिळणार आहे. 80 हजार प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. एक प्रकारच हे स्टेडियम आहे. मॅट आणि माती या दोन प्रकारात ही स्पर्धा होणार असून 950 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत” अशी माहिती महाराष्ट्र केसरीचे आयोजक मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
बक्षिसांचा पाऊस
महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्याला 14 लाखाची थार गाडी भेट देण्यात येईल. त्याशिवाय 5 लाखाच बक्षिस मिळणार आहे. उपविजेत्या स्पर्धकाल अडीच लाख रुपये आणि ट्रॅक्टर बक्षीस म्हणून दिला जाईल. 18 वजनी गटातील प्रत्येक विजेत्याला जावा कंपनीची एसडी गाडी भेट म्हणून दिली जाईल. 45 जिल्ह्यातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
Comments
Post a Comment