Abhijeet Katake Hind Kesari 2023 : पुण्याचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा हिंद केसरीच्या अंतिम सामन्यात पराभव करुन मानाची गदा पटकावली आहे. अभिजीत कटके याच्या विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष पहायला मिळत आहे. याआधी अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी होण्याचा मानही मिळवला होता. पुणे: प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात होणार आहे. येत्या मंगळवारपासून पुण्यात कोथरुडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनाधिकृत असल्याचं पत्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने काढलय. त्यामुळे गोंधळ निर्माण झालय. या पत्रावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक मुरलीधर मोहोळ यांनी भूमिका स्पष्ट केलीय. प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अधिकृत असल्याचं त्यांनी म्हटलय. बाळासाहेब लांडगेंनी काय म्हटलय? कुस्तीगीर परिषदेच्या नियम व अटी मान्य न केल्याने पुण्यातील स्पर्धा अधिकृत नसल्याचं कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी प...